आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीला भक्कम पाठिंबा द्या ; अजित पवार ,

श्रीरामपूर दि.12 (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार यांनी महायुती ने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती महिला वर्गात अतिशय लोकप्रिय ठरली.. याचप्रमाणे आम्ही मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिली आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण विद्यावेतन देऊ केलं. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान देऊ केलं आहे. यांसारख्या अनेक लोकहिताच्या योजना राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत असेही या प्रसंगी अजित पवार यांनी जाहीर सभेत नमूद केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीला भक्कम पाठिंबा द्या, असे आवाहन जाहीर सभेत अजित पवार यांनी या प्रसंगी केले.