राजकीय
हमीभावाव्यतिरिक्त, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7000 रुपये

पुणे दि. 15 (प्रतिनिधी ) आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सर्वसामान्य जनतेला संबोधित करताना आश्वासन दिले आहे की, केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7000 रुपये मिळावेत यासाठी महाविकास आघाडी सरकार बोनस देईल.
मल्लिकार्जुन खर्गे आणि महाविकास आघाडीच्या या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.