माझ्या अंगात जोपर्यंत श्वास आहे, प्राण आहे; तोपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही ; उद्धव ठाकरे

नाशिक दि. १५(प्रतीनिधी) नाशिक विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाशिक मध्यचे वसंत गीते, नाशिक पश्चिमचे सुधाकर बडगुजर व देवळाली विधान सभेचे योगेश घोलप ह्यांच्या प्रचारार्थ शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नाशिक येथे पार पडली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी संगितले की माझ्या अंगात जोपर्यंत श्वास आहे, प्राण आहे; तोपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही.
आपला महाराष्ट्र जे गुजरातच्या चरणी वाहायला निघाले आहेत. त्यांना मतदान करू नका. ही महाराष्ट्राशी गद्दारी ठरेल असे आवाहन जाहीर सभेत केले. ज्या वेळी देशावर संकट येत त्यावेळी छातीचा कोट करून देशाच्या रक्षणासाठी धावून जाणारा माझा महाराष्ट्र आहे. असे वक्तव्य या वेळी त्यांनी केले.
याप्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक ह्यांनी नाशिक येथील जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.