महाराष्ट्रची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे भाजपाचे ध्येय ; भाजपा आमदार निरंजन डावखरे

नाशिक दि. १२(प्रतीनिधी) : विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपा महाराष्ट्रच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी नाशिक येथे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजपाचे संघटन मंत्री व प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांतजी जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव, उत्तर ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, विजय साने, बाळासाहेब सानप, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे आदी उपस्थित होते.
देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भाजपाचा संकल्प असून, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याचे भाजपाचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे पत्रकार परिषदेत भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.
या संकल्प पत्रासाठी सामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. ८७७ गावांमधून ई मेल, पत्रे आली. ८९३५ सूचना आल्या. संकल्प पत्रातील एकेक मुद्याची अमंलबजावणी करण्यासाठी समिति नेमली जाईल अशी माहिती या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.