शेती
देशभरात 614 लाख हेक्टरवर झाली रब्बी पिकांची पेरणी ; केंद्रीय कृषी मंत्रालय

नवी दिल्ली : ३१ | (सौ.पिआयबी) यंदाच्या रब्बी हंगामात देशभरात 614 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यंदा गव्हाच्या पेरणीअंतर्गतचे क्षेत्र 319.74लाख हेक्टरवर पोहचले आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 313 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. याशिवाय यंदाच्या रब्बी हंगामात 136.13 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची शेती झाली असल्याची नोंद झाली आहे. तर 48.55 लाख हेक्टर क्षेत्रावर श्री अन्न,भरड धान्यांची पेरणी झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं कळवलं आहे. यासोबतच यंदाच्या रब्बी हंगामात तेलबियांच्या पेरणीनं 96.15 लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला असल्याची माहितीही केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे.