राजकीय
महविकास आघाडी महाराष्ट्राच्या जनतेचे काहीही भले करु शकत नाही ; गृहमंत्री अमित शाह

कराड (प्रतिनिधी) लांगूलचालनात अखंड बुडालेली महविकास आघाडी महाराष्ट्राच्या जनतेचे काहीही भले करु शकत नाही. महाराष्ट्रातील सर्व वर्गांच्या आकांक्षांची पूर्तता महायुती सरकारच करु शकते. विकास आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या महायुती सरकारलाच पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना केले.