महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीचा महारष्ट्रनामा प्रसिध्द

मुंबई दि.10 (वृत्त सेवा)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी
महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मविआतील मित्रपक्षांच्या विशेष उपस्थितीत रविवारी मुंबईत प्रकाशित करण्यात आला.
सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाचा हा महाराष्ट्रनामा स्वाभिमानी महाराष्ट्राची नांदी आहे. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हे महाविकास आघाडीचे व्हिजन आहे. महाराष्ट्रातील जनतेचे महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार अभिषेक मनु सिंघवी, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते.