आपला जिल्हा
माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाला भेट

नासिक दि. 16(प्रतिनिधी) नासिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मतदारसंघात भेट दिली. यावेळी संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली .तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्याला आदरांजली अर्पण केली.