ताज्या घडामोडी

राजस्थानमधील जोधपूर येथे बीएसएफच्या 60 व्या स्थापना दिनानिमित्त संचलन

जोधपुर | दि.८ (सौ.पीयाबी)  गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आज राजस्थानमधील जोधपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 60 व्या स्थापना दिन संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंह चौधरी आणि अन्य अनेक मान्यवरही उपस्थित होते.

आपल्या भाषणात गृहमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेच्या स्थितीत मोठे बदल झाले असून बीएसएफ जवानांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. गेल्या सुमारे सहा दशकांच्या  काळात बीएसएफने धैर्य, शौर्य आणि बलिदानाद्वारे देशाच्या संरक्षणाची पहिली फळी मजबूत केली आहे. बीएसएफने सीमेवरील सर्व आव्हानांचा समर्थपणे सामना केला असून देशाचे संरक्षण करणारी आघाडीची फळी सक्षम बनविली आहे.

ABF00642.JPG

बीएसएफ हे 2.7 लाख एवढी जवानांची संख्या असलेले  जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधोरेखित केले. बीएसएफने 2024 मध्येही, विविध कारवाया राबवून बनावट चलन, अंमली पदार्थ, घुसखोरी आणि डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद्यांविरोधात लढण्याची आपली परंपरा कायम राखली आहे. देशाच्या संरक्षणाची पहिली फळी म्हणून कर्तव्य बजावताना, 1992 बीएसएफ जवानांनी बलिदान दिले असून त्यापैकी 1330 जणांना आजपर्यंत पदके देण्यात आली आहेत. यामध्ये 1 महावीर चक्र, 6 कीर्ती चक्र, 13 वीर चक्र, 13 शौर्य चक्र, 56 सेना पदके आणि 1,241 पोलीस पदकांचा समावेश आहे.

9B7A3034.JPG

बांगलादेशच्या सीमेवर 591 किलोमीटर भागात कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सीमेवर 1,159 किलोमीटर टप्प्यात फ्लडलाइट्स बसविण्यात आले आहेत तसेच 573 सीमा चौक्यांसह 579 टेहळणी चौक्या बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय 685 ठिकाणी वीज जोडण्या, 575 ठिकाणी नळजोडण्या  आणि 570 सौर वीज निर्मिती संयंत्रे बसवण्यात आली आहेत. मोदी सरकारने सुमारे 1,812 किलोमीटरच्या दुर्गम भूभागावर सीमा रस्ते बांधण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे या भागातील गावांच्या दळणवळण व्यवस्थेत वाढ झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात ड्रोनची समस्या अधिक गंभीर होणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, हे आव्हान ओळखून, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सर्व सीमा सुरक्षा दल, संरक्षण मंत्रालय, डीआरडीओ आणि भारत सरकारच्या विविध संशोधन विभागांचा समावेश असलेल्या  सरकारच्या समग्र   दृष्टीकोनातून  लेझर-सुसज्ज अँटी-ड्रोन गन माउंट सिस्टम विकसित करण्यात आली आहे. या सैनिकांच्या समर्पण आणि शौर्याशिवाय 2047 पर्यंत पूर्ण विकसित भारताचे पंतप्रधान मोदी यांचे  स्वप्न साध्य करणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.  सैनिकांचे  धैर्य, त्याग आणि वचनबद्धतेमुळेच  हे ध्येय साध्य होऊ शकते,  असे गृहमंत्री म्हणाले.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.