आरोग्य व शिक्षण
कोचिंग क्षेत्रासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली दि.13 (वृत्तसेवा) : ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कोचिंग (खाजगी शिकवणी संस्था-केंद्र) क्षेत्रात पारदर्शकता राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) ने कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
‘कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, 2024,’ चा उद्देश सामान्यतः कोचिंग सेंटर्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या फसव्या मार्केटिंग पद्धतींपासून विद्यार्थी आणि जनतेचे संरक्षण करणे हा आहे, असे सीसीपीएच्या मुख्य आयुक्त आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली येथे या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.