ताज्या घडामोडीराजकीय
शिर्डी विधानसभेची निवडणूक दहशत आणि अहंकाराच्या विरोधात ; बाळासाहेब थोरात

शिर्डी,(प्रतिनिधी) शिर्डी विधानसभेची निवडणूक दहशत आणि अहंकाराच्या विरोधातील आहे. येथे घटनेच्या मूलभूत तत्वांचीच पायमल्ली होते आहे, आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यासमोर आली आहे असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील जाहीर सभेत केले. प्रभावती घोगरे यांच्या रूपाने अत्यंत सक्षम सुसंस्कृत आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवार आपल्याला मिळालेल्या आहे.
मोकळा श्वास घ्यायचा असेल तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही, ‘अभी नही तो कभी नही’ हा या निवडणुकीचा संदेश आहे. पुढील बारा दिवस झोकून देऊन काम, करा परिवर्तन अटळ आहे असेही या प्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी जाहीर सभेत आपले मनोगत मांडले.