राजकीय
मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची ‘संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

मुंबई : (दि. २२ ऑगस्ट ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार व राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्वपूर्ण ‘संघटनात्मक आढावा बैठक’ पार पडली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेली मतचोरी, मतांचा वाढलेला आकडा आणि एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या फसलेल्या मतदान प्रक्रियेतील अनुभव मान्यवरांनी उपस्थितांसमोर मांडला.
मतदारांची दुबार नोंदणी, महाविकास आघाडीच्या मतदारांची संशयास्पद विभागणी, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यात मतदारांचा वाढलेला लक्षणीय आकडा आणि एकूणच केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका ह्यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, विधिमंडळ पक्षनेते व आमदार जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा व राज्यसभा खासदार फौज़ियाताई खान, राष्ट्रीय युवक अध्यक्ष फहाद अहमद, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी हर्षवर्धन पाटील, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे विदर्भ विभाग प्रभारी राजेंद्र शिंगणे, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे अमरावती जिल्हा निरीक्षक रमेश बंग, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी आमदार रोहित पवार,खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, खासदार सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे, आमदार बापूसाहेब पाठारे, यांच्यासह पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.