ताज्या घडामोडी
द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, २०२५ संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत

नवी दिल्ली : (दि. २३ ) संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025 अर्थात ऑनलाईम गेमिंग प्रचार प्रसार आणि नियमन विधेयक 2025 संमत झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
या विधेयकातून भारताला गेमिंग, नवोन्मेष आणि सर्जनशीलतेचे केंद्र बनण्याप्रति केंद्र सरकारची वचनबद्धता ठळकपणे अधोरेखित होत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. या विधेयकामुळे ई-स्पोर्ट्स अर्थात ई-क्रीडा आणि ऑनलाइन सामुदायिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळेल, त्याच वेळी पैशांवर आधारित ऑनलाईन खेळांच्या नुकसानकारक दुष्पपरिणामांपासूनही समाजाचे संरक्षण होईल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.