राजकीय
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी

शिर्डी दि. १३ (प्रतीनिधी) : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना संगितले की
“आज मला महाराष्ट्रातील शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात जाऊन दर्शनाचे आणि प्रार्थना करण्याचे सौभाग्य लाभले. साईबाबांची सर्वसमावेशकता, सेवाभाव, सद्भावना ही शिकवण कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणा आहेत. त्यांचे विचार आपल्याला सदैव समाजासाठी समर्पणाची शिकवण देतात.”