ताज्या घडामोडी
ऐतिहासिक जनादेशासाठी महाराष्ट्राच्या जनतेला कोटी कोटी प्रणाम ; गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल भाजपचे जेष्ठ नेते व गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आपले मनोगत व्यक्त केले.
या ऐतिहासिक जनादेशासाठी महाराष्ट्राच्या जनतेला कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी, महात्मा ज्योतिबा फुले जी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जी यांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राने, विकासाबरोबरच संस्कृती आणि राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या महायुतीला एवढे प्रचंड बहुमत देऊन, संभ्रम आणि खोटेपणाच्या आधारे संविधानाचे नकली हितचिंतक बनणाऱ्यांच्या दुकानाला टाळे ठोकण्याचे काम केले आहे. हा विजय प्रत्येक महाराष्ट्रवासियाचा विजय आहे.