देश विदेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजित पवार दिल्ली दौर्यावर

नवी दिल्ली : दि. २८ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख अजित पवार हे दिल्ली दौर्यावर असून गुरुवारी दुपारी स्नेहभोजन कार्यक्रमानिम्मित दिल्लीतील पत्रकार बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विविध सामाजिक व राजकिय विषयांवर चर्चा झाली.
तसेच गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष. जे पी नड्डा, शिवसेना पक्षप्रमुख. एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि प्रांताध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे उपस्थित होते.