कौल जनतेचा.. महाविजय महायुतीचा! ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे | दि. 23 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तमाम लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनी महायुतीला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच आजचा हा महायुतीचा महाविजय शक्य झाला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी जनतेशी संवाद साधताना दिली.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शाह यांचे सहकार्य, विकास आणि जनहित योजनांची योग्य सांगड, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मेहनत व लाडक्या बहीण-भावांचे आणि जनतेचे प्रेम यांचा हा महाविजय आहे. असेही या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.