ताज्या घडामोडी
देवळालीचं मत विकासाला ; अजित पवार

नाशिक दि.16(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची गिरणारे नाशिक येथे जाहीर सभा पार पडली. अजित पवार यांनी जनतेशी विकासाच्या मुद्द्यावर संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.