प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यापासून आम्हाला का अडवले जात आहे? ; लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा सवाल

गाझियाबाद उत्तर प्रदेश (वृत सेवा) : उत्तर प्रदेशातील हिंसाचार ग्रस्त संभलमधील पीडितांना भेट देण्यासाठी जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बुधवारी अडवण्यात आले. त्या वेळी त्यांनी घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोलिसांनी आम्हाला संभल ला जायला थांबवलं, विरोधी पक्ष नेता म्हणून तो माझा अधिकार आणि कर्तव्यही आहे,कि मी तिथे जावं; तरी पण मला आडवले गेले. मी एकटा ही जायला तयार होतो पण ते ही त्यांनी ऐकल नाही,हे त्यांचं वागणं संविधान विरोधी आहे. मी ग्राऊंड झीरोला जाऊन खरी परिस्थिती समजून घेणार होतो आणि प्रभावित कुटुंबांना भेटणार होतो. पण भारतीय जनता पार्टी का घाबरली आहे? त्यांनी स्वतः चं अपयश झाकण्यासाठी पोलिसांना का पुढे केले? प्रेम आणि बंधुभावाचा संदेश देण्यापासून आम्हाला का अडवले जात आहे?