क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चे सचिव जय शाह यांनी अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून १ डिसेंबर २०२४ पासून पदभार स्वीकारला. शाह यांनी ग्रेग बार्कले यांच्या कडून ICC चे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. जय शाह हे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणारे पाचवे भारतीय आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून जगमोहन डालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि एन श्रीनिवासन यांनी कामकाज बघितले आहे.
या प्रसंगी समाज माध्यमांशी जय शाह यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज ICC चेअरमन म्हणून माझ्या भूमिकेची सुरुवात करताना मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो जगभरातील लाखो लोकांना एकत्र करतो आणि हा एक अफाट जबाबदारी आणि संधीचा क्षण आहे.