करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या महाविजयाचा संकल्प

कोल्हापूर : दि. 5 मंगळवार (वृत सेवा) कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेपुर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या महाविजयाचा संकल्प केला.
आईच्या आशीर्वादाने राज्याच्या विधानसभेवर महायुतीचा भगवा नक्की डौलाने फडकवू असा दृढनिश्चय करून याप्रसंगी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश अबीटकर, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे उपस्थित होते.