महाराष्ट्र
डॉ. बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेले उपोषण सोडल

पुणे | दि. 30 | (प्रतिनिधी) डॉ. बाबा आढाव ह्यांनी निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या अनियमिततेविरोधात सुरू केलेल्या ‘आत्मक्लेष’ आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी भेट दिली. ह्यावेळी डॉ. आढाव ह्यांनी उपोषण सोडण्यासाठी केलेली उद्धव ठाकरे यांची विनंती मान्य करत आपले उपोषण मागे घेतले.
ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, विधिज्ञ असीम सरोदे, पुणे शहरप्रमुख संजय मोरे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.