आपला जिल्हा
मायक्रो-मिडीयम-स्मॉल इंडस्ट्रीसाठी स्वतंत्र खातं उभारणार ; आदित्य ठाकरे

नाशिक दि. 8 (प्रतिनिधी): नाशिक पश्चिम विधानसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्य विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते ह्यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या जाहीर सभेत उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की
महाराष्ट्राला सुवर्णकाळ दाखवायचा असेल तर तरुणांना रोजगाराची संधी मिळायला हवी. आपलं सरकार आल्यानंतर मायक्रो-मिडीयम-स्मॉल इंडस्ट्रीसाठी आपण स्वतंत्र खातं उभारणार आहोत, ज्यातून तरुण तरुणींना भूमिपुत्रांना रोजगार आणि उद्योगधंद्याचं प्रशिक्षण मिळेल.