आपला जिल्हा
नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले विजयी

नाशिक | दि.23 (विशेष प्रतिनिधी) नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम हुलावळे यांनी विजयी घोषित करून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
राहुल ढिकले यांना १५६२४६ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे गणेश गीते यांचा ८७८१७ मतांनी पराभव केला. गणेश गीते यांना ६८४२९ इतकी मते मिळाली आहे.
राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून दुसर्यांदा आमदार म्हणून विजयी झाले.