ताज्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

नवी दिल्ली | दि.६ | भारताचे भाग्यविधाते व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय राज्य मंत्री खासदार रामदास आठवले, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व उपस्थित मान्यवर यांनी नवी दिल्लीतील संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.