आपला जिल्हा
महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने संविधानाच्या गैरवापरास बंदी घालावी ; प्रवीण दरेकर

नाशिक (वृत्त सेवा) भाजपा महायुतीच्या निवडणूक प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकर नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.. यावेळी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतर्फे संविधान बदलाचा सुरु असलेला अपप्रचार खोडून काढला आणि संविधानाचा अपप्रचार करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने संविधानाच्या गैरवापरास बंदी घालावी, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी या प्रसंगी केली.