राजकीय
सर्वांगीण उन्नतीसाठी तानाजी सावंत यांनाच पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून देत विधानसभेत पाठवावे ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव (वृत्त सेवा) धाराशिव जिल्हातील भूम_परांडा_वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारासाठी आज परांडा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली प्रचारसभेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. या मतदारसंघाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तानाजी सावंत यांनाच पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून देत विधानसभेत पाठवावे असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. हा मतदारसंघ वर्षानुवर्षे शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून तो अभेद्य ठेवण्याची जबाबदारी तानाजी सावंत यांच्या खांद्यावर आहे. काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण आपण सोडवून आणला. आपले सरकार स्थापन झाल्यामुळे या मतदारसंघात दोन हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी देता येणे शक्य झाले याचे समाधान असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.