तारकर्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हृदय

बीच बद्दल
विचार करा, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हृदय म्हणता येईल असे तारकर्लीच्या निवांत समुद्रकिनारी आपण लाटांचा स्पर्श अनुभवत आहात, प्रवाळाच्या बेटांनी (कोरल रीफ्स) वेढलेल्या पाण्यातून टोणकी मासा (बॅराकुडा), माकूळ आणि समुद्री कासव आपल्या जवळून जात आहेत. एक विलक्षण अनुभव वाटतो ना?
बोटींग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग सह निसर्गरम्य सुंदर समुद्र किनारा यामुळे तारकर्ली हे देशविदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरते.याचबरोबर इथली असीम शांतताही तुम्हाला खुणावतेय.
हे आकर्षण तसे साहजिक आहे, जितका सुंदर इथला समुद्रकिनारा तितक्याच थरारक जलक्रीडा या ठिकाणी होतात. इथल्या अनेक बीच शॅक वर आपण सूर्यास्ताचे अद्भुत नजाऱ्यांचा अनुभव घेत निवांत वेळ घालवू शकता. इतकेच नाही तर अथांग समुद्राखालील विस्मयकारक विश्वाचे साक्षीदार होत आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायला नक्की आवडेल. कारण तारकर्ली हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूबा डायव्हिंग केंद्र आहे.
हाच साहसी अनुभव आपण घेऊ इच्छित असाल तर तारकर्ली समुद्रकिनार्यावरील महाराष्ट्रातील शासनाचे स्कूबा डायव्हिंग केंद्र आपली ही इच्छा पूर्ण करायला सज्ज आहेच. एकूण काय तर प्रत्येक पर्यटकासाठी तारकर्ली मध्ये एक अद्भुत अनुभव वाट पाहतोय, चला तर सज्ज व्हा.