ताज्या घडामोडी
आचार संहिता भंगाच्या 2062 तक्रारी प्राप्त ; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय

मुंबई (प्रतींनिधी) : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचार संहिता लागू झाली. 15 ऑक्टोबर ते 1 नोहेंबर २०२४ पर्यन्त राज्यभरात सी-व्हिजील (C-Vigil app) वर एकूण 2062 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 2059 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.