आपला जिल्हा

मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातून AIMIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक १६२ मतांच्या फरकाने विजयी

मालेगाव | दि. 23 | मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातून ऑल इंडिया मजलिस ई इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर यांनी विजयी घोषित केले या वेळी नितीन सदगीर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांना १०९६५३ मते मिळाली.

चुरशीच्या झालेल्या लढती मध्ये मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी  फक्त १६२ मतांनी त्यांचे प्रतिस्पर्धी   इंडियन सेकूलर लार्जेस्ट असीम्ब्ली ऑफ महाराष्ट्र  चे उमेदवार आसिफ शेख  रशीद यांचा पराभव केला. आसिफ शेख  रशीद  यांना १०९४९१ मते पडली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.