महाराष्ट्र
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शहीद हुतात्म्यांना विनम्र अभिवादन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.21 (प्रतिनिधी) हुतात्मा स्मृती दिनानिमित्त 21 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकास भेट देऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले.
महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या १०७ जणांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो.
याप्रसंगी दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.