राजकीय
मुंबईतील सर्व विकासकामे ठप्प करण्याचा प्रयत्न मविआच्या काळात झाला ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (प्रतीनिधी) दि .११ : “मुंबईतील सर्व विकासकामे ठप्प करण्याचा प्रयत्न मविआच्या काळात झाला होता. परंतू आम्ही मात्र कोस्टल रोड, एमटीएचएल, समृद्धी महामार्ग, कुलाबा-बीकेसी-सीप्झ हे मेट्रो मार्ग हे प्रकल्प पूर्ण केले. मुंबईतील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात यंत्रणा एकत्र करून काम सुरू केले.”
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे महायुतीतील उमेदवार दिलीप लांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य