महाराष्ट्र
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार ; नाना पटोले

मुंबई | दि.२७ (प्रतिनिधी) | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची पत्रकार परिषद टिळक भवन, मुंबई येथे पार पडली. कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना परिषदेत माहिती दिली की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली असून लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस जनभावनेचा आवाज उठवत रस्त्यावर उतरणार आहे.
येत्या दोन दिवसानंतर मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, मा. प्रमोद मोरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.