ताज्या घडामोडी

भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त शुभेच्छा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  | दि.४ |  भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त शुभेच्छा देताना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षा व प्रगती प्रती  त्यांच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली.

मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावरील  पोस्टमध्ये लिहिले,

“देशाच्या सागरी सीमांचे अतुल्य धाडसाने  व समर्पणभावाने रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त आम्ही प्रणाम करतो . त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आपल्या  देशाची सुरक्षा व प्रगती  सुनिश्चित होते. भारताच्या समृद्ध नौदल इतिहासाचादेखील  आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.