महाराष्ट्र
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांची पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाला भेट

संगमनेर | दि.४|(प्रतीनिधी) संगमनेर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी आपल्या कामाची सुरवात करण्यापूर्वि महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाला सोमवारी भेट देऊन आदरांजली वाहिली. तसेच मा.खा.स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. आमदार अमोल खताळ पाटील यांनी कॉंग्रेसचे दिग्गज व जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला होता. खताळ पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे अनेक वर्षांपासून मतदार संघावर असलेले वर्चस्व मोडीत काढले.