महाराष्ट्र
नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई व माहिमचे महेश सावंत यांचे विशेष अभिनंदन ; उद्धव ठाकरे

मुंबई दि. 23 | शिवसेनेचे बालेकिल्ले खेचून आणणारे वांद्रे पूर्वचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई आणि माहिमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत ह्यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले.
वांद्रे पूर्वचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे झिशान बाबा सिद्दिकी यांचा ११३६५ मतांनी पराभव केला. वरुण सरदेसाई यांना ५७७०८ मते मिळाली. तर झिशान बाबा सिद्दिकी यांना ४६३४३ मते मिळाली.
माहिमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सदा सरवणकर यांचा १३१६ मतांनी पराभव केला. आमदार महेश सावंत यांना ५०२१३ मते मिळाली. तर सदा सरवणकर यांना ४८८९७ मते मिळाली. याच मतदार संघात मनसे चे अमित राज ठाकरे यांना ३३०६२ मते मिळाली.