ताज्या घडामोडी
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून भाजप महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे विजयी घोषित

नाशिक | दि.23 (विशेष प्रतींनिधी) नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्पित चौहान यांनी विजयी घोषित करून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. देवयानी फरांदे यांना 105689 मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे वसंत गीते यांचा 17856 मतांनी पराभव केला आहे. वसंत गीते यांना 87833 इतकी मते मिळाली आहे.