आपला जिल्हा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न

नाशिक (प्रतिनिधी) : दि. १४ : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, आर्मस्ट्रॉग रोबोटिक्स अँड टेक्नॉलाजीचे विनित माजगावकर, गिव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे रमेश अय्यर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आशिमा मित्तल, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.