आपला जिल्हा

भाजपा महायुती सरकार शेतकरी विरोधी

नाशिक दि.12 (प्रतिनिधी) मारुती मंदिर, आडगाव येथे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार  गणेश गीते यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची जाहीर  सभा  पार पडली.

सभेला  संबोधित करताना पवार यांनी भाजपा, महायुती सरकारवर सडकून टीका केली. महायुती सरकार शेती विरोधात निर्णय घेत असून शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याचे यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आमचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेतून महिलांना तीन हजार देऊन शेतकरी हिताचे निर्णय घेऊ, असेही या वेळी शरद पवार यांनी स्पष्ट  केले.

यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले पाहिजे असे आवाहन या प्रसंगी  केले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या धुळे येथील खासदार शोभा बच्छाव, नाशिक पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर, नाशिक मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते, महाविकास आघाडी देवळालीचे उमेदवार योगेश घोलप, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना उपनेते सुनिल बागुल, शिवसेना नेते दत्ता गायकवाड, प्रेस नेते जगदीश गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नानासाहेब महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अतुल मते, काँग्रेसचे पदाधिकारी शरद आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष गजानन शेलार,

काँग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे,गजानन शेलार, भाकपचे नेते राजू देसले यांच्यासह यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतमजूर, शेतकरी, नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

..

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.