आपला जिल्हा
अहिल्यानगर मनमाड रस्त्याचे काम याच महिन्यात नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून चालू करणार ; केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी

नवी दिल्ली दि.११ | अहिल्यानगर मनमाड रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी व संबंधित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन याबाबत चर्चा केली. याच महिन्यात नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी नितिन गडकरी यांनी सुजय विखे पाटील यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत दिले.