शेती
यंदाच्या रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून अधिक पीक पेरणी ; कृषी मंत्रालय भारत सरकार

नवी दिल्ली : दि.3: केंद्रीय कृषि मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या वर्षीच्या 187.97 लाख हेक्टर गहू पेरणीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 200.35 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी 105.14 लाख हेक्टरवर झालेल्या रब्बी कडधान्य पेरणीच्या तुलनेत यंदा 108.95 लाख हेक्टर क्षेत्र कडधान्य पेरणीखाली आले आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 24.67 लाख हेक्टरवर अन्न आणि भरड तृणधान्याच्या पेरणीच्या तुलनेत यंदा 29.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे