राजकीय
नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी मशालीला भरघोस मत द्या ; आदित्य ठाकरे

वैजापूर (प्रतिनिधी) तरुणांच्या हाताला रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव व कर्जमाफी, महिलांना सुरक्षा आणि सन्मान, विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण देण्यासाठी
प्रत्येकाच्या हाती मशालच हवी असे मत उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले
-वैजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश परदेशी ह्यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत आपल्या स्वप्नातला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला मशालीलाच भरघोस मत देण्याचे आवाहन या वेळी आदित्य ठाकरे यांनी केले.