वाराणसीच्या नमो घाटाचे उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण

वाराणसी दि. 15 (वृत सेवा) उत्तर प्रदेशातील काशी मध्ये कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त आयोजित देव दिवाळीनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भव्य नमो घाटाचे उद्घाटन केले.
हर हर महादेवचा जयघोष आणि डमरू वाजवून आणि शंख फुंकून नमो घाटाचे उद्घाटन काशीवासीयांच्या हस्ते दगडी पाटाचे अनावरण करून करण्यात आले.
भारताचे उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनी नमो घाटाच्या उद्घाटन प्रसंगी संगितले की स्वतःमधील स्वदेशी भाव जागृत करा. स्वदेशी हा आपल्या स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. स्वदेशी दिवा- देशाची माती, तेल आणि कापूस यांचे प्रतीक आहे. एका दिव्यातून अनेक दिवे प्रज्वलित होतात, जे स्वदेशी आत्म्याच्या जागरणाचे आणि प्रसाराचे प्रतीक आहे. यामुळे आत्मनिर्भरता वाढते, परकीय चलनाची बचत होते आणि स्वदेशी रोजगाराचा विस्तार होतो. प्रत्येक व्यक्ती यामध्ये योगदान देऊ शकते.
या प्रसंगी उत्तर प्रदेश चे मुखमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना संगितले की – देव दिवाळीचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे.