क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात संपन्न

मुंबई | दि.४ | भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात मंगळवारी पार पडला. स्मारकाच्या अनावरण सोहोळ्यास रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, मनसे प्रमुख राज ठाकरे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढयांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे. हे स्मारक येणाऱ्या पिढयांना प्रेरणा देईल अशी मला आशा आहे.