देश विदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपतींची सदिच्छा भेट

नवी दिल्ली (सौ.महासंवाद) | दि.११ | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.