देश विदेश
आपली राज्यघटना ही जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली | दि.२६ | २६ नोहेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ह्या नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संविधानाचा स्वीकार केल्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ समारंभाला उपस्थित होत्या.
या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात संगितले की “आपली राज्यघटना ही जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे. आपल्या दूरदृष्टी असलेल्या संविधान निर्मात्यांनी बदलत्या काळाच्या गरजेनुसार नवीन विचार अंगीकारण्याची व्यवस्था केली होती.”