विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही नेत्यांना धडा शिकवा ; माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार

नाशिक (प्रतींनिधी) 4 नोव्हेबर 2024 : नाशिक येथे भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र मीडिया सेंटर नाशिक येथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी वर जोरदार हल्ला चढवला. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ भारती पवार यांनी संगितले की विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर पहिले पाऊल टाकणार्या महाराष्ट्राला तब्बल दहा वर्ष मागे नेऊन विकासाची वाट रोखणार्या महाविकास आघाडी सरकार व नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद झालेले उद्धव ठाकरे तसेच मविआचे अन्य नेते यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जंग पुकारला असून महाराष्ट्र द्रोही विकासद्रोही, शेतकरी विरोधी, महिला व युवक विरोधी मविआ विरोधात प्रदेश भाजपा तर्फे दररोज आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.