ताज्या घडामोडी
निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबई : (प्रतींनिधी) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर जनमत चाचणी (exit poll ) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिावाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.