राजकीय
विधानसभेचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे आलेला नाही ; शरद पवार

कराड | दि.24 (प्रतिंनिधी) | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना काही ठळक मुद्दे मांडले.
विधानसभेचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागलेला नाही. असा अनुभव आम्हाला कधीही आलेला नव्हता. त्याचा अभ्यास करून पुन्हा एकदा नव्या उत्साहाने आम्ही लोकांमध्ये जाऊ.
तसेच यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य चांगले राहिले पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न राहील. नवे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तातडीने घेईल अशी अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बटेंगे तो कटेंगे हे जे भाष्य केले त्यामागे मतांचे ध्रुवीकरण व्हावे असा दृष्टिकोन होता.