महाराष्ट्र
“निळ्या झेंड्याची मिळाली साथ..म्हणून महायुतीवर झाली मतदानाची बरसात…” ; केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

मुंबई | दि. २४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभेत महायुतीला महाविजय मिळाल्याबद्दल महायुतीचा घटकपक्ष म्हणून विजयोत्सव साजरा करताना ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. तसेच महायुतीचा विजयोत्सव लाडू वाटून साजरा केला. या प्रसंगी बोलताना आठवले म्हणाले की “लाडक्या बहिणीच्या नारीशक्ती सोबत आंबेडकरी जनतेच्या भीमशक्ती मुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय झाला. “